पुणे (प्रतिनिधी)- चतुःशृंगी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत आयुष उर्फ बंटी विठ्ठल चव्हाण (टोळी प्रमुख) याच्यासह साथीदाराविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यानुसार केलेली ही ६८वी कारवाई आहे.
आयुष उर्फ बंटी विठ्ठल चव्हाण (वय २१, रा. गोखलेनगर, टोळीचा म्होरक्या), बाबू उर्फ बाबा सूर्यकांत डोंगरे (वय १९, रा. वडारवाडी), कृष्णा राजू पवार (वय १९, रा. जुनी वडारवाडी), मयूर उर्फ गणेश सुनील बिटकर (रा. वडारवाडी) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत आयुष उर्फ बंटी याने नवीन साथीदारांना सोबत घेऊन स्वत:ची संघटित टोळी केली होती. टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या वतीने अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. गुन्ह्याचा तपास एसीपी आरती बनसोडे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा आयुक्त शशिकांत बोराटे, एसीपी आरती बनवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, एपीआय रत्नदीप गायकवाड, अमित गद्रे, सुहास पवार यांनी केली.
वादातून केला होता तरुणावर बार गाडीला कट मारल्याच्या रागातून टोळक्याने ११ सप्टेंबरला फिर्यादी तरुणाला अडवून मारहाण केली. धारधार हत्याराने फिर्यादी यांना जखमी केले. याप्रकरणी चतुःसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता




