देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर 6 संस्थांवर बंदी घातली आहे. कंपनीने 15 ऑक्टोबर रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने कंत्राटदारांसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी किमान 100 कोटी रुपये कमावल्याचाही अंदाज आहे.
टाटा ग्रुपच्या आयटी कंपनीने रविवारी संध्याकाळी उशिरा या कारवाईबाबत निवेदन जारी केले. कंपनीने सांगितले की, भरती घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, कंपनीचे 19 कर्मचारऱ्यांचा भरती घोटाळ्यात हात असल्याचे आढळले. त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर 3 कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकण्यात आले.