नवी मुंबई. : रेल्वेमध्ये नौकरीला लावण्याच्या प्रलोभन नागपूर येथे राहणाऱ्या एका महिलेला बनावट नियुक्ती पत्र पाठवत ४ लाख ६३ हजारचा गंडा पातल्याचा प्रकार उपडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी रेलवे पोलिसांनी यासंबंधित टोळीविरोधात गुन्हा त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी भारती कुंभारे या नागपूर येथे राहतात. गत जानेवारीमध्ये कुंभारे यांची समान समय साठी या महिलेशी ओळख झाली होती. त्यांनी रेल्वेमध्ये वर्ग-३च्या सरकारी नोकरीची माहिती दिली. नोकरीच्या प्रलोभनाने एप्रिलमध्ये अडीच लाख रुपये व कागदपत्रे घेऊन फिर्यादी भारती कुमारे यांनी दिल्ली गाठली. यावेळी कुंभारे यांच्याकडून प्रोसेसिंग शुल्काच्या बहाण्याने ६० हजार रुपयेही घेतले गेले. या वेळी त्यांना गाझाबाद येथे नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्ती पत्र देण्यात आले. मात्र नोकरी न मिळाल्याने या वेळी फिर्यादीने आपले पैसे परत मागितल्यावर या टोळीने भारतीला सोसावे येथे क्ि झाल्याचे नियुक्ती पत्र मिलदारे पाठवून दिले.
कंत्राटी पद्धतीवर ट्रेनिंग….
भारती यांनी गत जून महिन्यात सीवूड्स रेल्वे स्टेशन येथे अनाऊन्सर कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर ट्रेनिंग सुरू केले. मात्र त्यानंतर स्टेशन प्रबंधकाने त्यांचे प्रशिक्षण है बेकायदेशीर असल्याचे सांगितले यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने गत आठवड्यात वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.



