मुंबई ; प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाठी पालना देणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १९) ५०० ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्यो आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
लोढा पुढे म्हणाले राज्यातील 28 हजार ग्रामपंचायत मध्ये एकही कौशल्य विकास केंद्र नाही. या अनुषंगाने ५०० ग्रामपंचायत मध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजगारासाठी गावातील तरुणांचे शहराकडे स्थलांतर होऊ नये, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. भविष्यात अधिकाधिक तरुणांना रोजगार स्थानिक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आखली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ज्या गावांमध्ये ही योजना सुरू होणार आहे त्याच्या आजूबाजूच्या गावातील सर्व घटकांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. लोकप्रतिनिधीसह आशा व अंगणवाडी सेविका यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. विश्वकर्मा योजनेची संबंधित सर्व लाभार्थी व अन्य घटकांचाही यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे असे लोढा यांनी सांगितले.



