मुंबई : गेल्या पाच दशकांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली काळी पिवळी प्रीमिअर टॅक्सी रविवारी मध्यरात्रीपासून इतिहासजमा झाली. या टॅक्सीची २० वर्षांची आयुष्य मर्यादा संपुष्टात आल्याने हजारो चालक प्रवाशांसाठी रविवारचा प्रवास अखेरचा ठरला. उन्हाळा असो वा पावसाळा, प्रत्येकवेळी या टॅक्सीतून लाखो नागरिकांचा सुखद प्रवास झाला आहे.
मुंबईच्या वाहतुकीत मोलाची भूमिका बजावलेली वाहतुकीची दोन साधने एकामागोमारा काळाच्या पडद्याआड गेली आहेत. नुकतेच बेस्टच्या डबल डेकर बस चंद झाल्यानंतर आता पश्चिनी प्रीमिअर टॅक्सी बंद झाली आहे. सुख दुःखाच्या क्षणी अनेकांनी या टॅक्सीचा पर्याय निवडला असून, इच्छितस्थळ गाठलेले आहे. ज्या प्रकारे डबल डेकर बस इतिहासप्रेमीसाठी संग्रहालयात जतन करण्यात आली आहे.
त्याच प्रकारे काळीपिवळी प्रीमिअर टॅक्सीचेही जतन करावे, जेणेकरून या टॅक्सीशी जुडलेल्या आठवणी कायम टिकून राहतील, अशी भावनिक हजारो टॅक्सीचालकांनी प्रशासनाला घातली आहे. यह मुंबई की शान है. और हमारी जान है, अशी भावनिक प्रतिक्रिया ताइदेव आरटीओत २१ ऑक्टोबर २००३ रोजी शेवटच्या रजिस्ट्रेशन करणांचा पचिनी प्रीमिअर टॅक्सीचे मालक अ कार्सेकर व्यक्त केली.



