हैदराबाद : वृत्तसंस्था
केसीआर यांचे तेलंगणातील बीआरएस सरकार टोकाचे भ्रष्ट आहे. असदुद्दीन ओवैसींची एमआयएमही धुतल्या तांदळाची नाही. याउपर ईडी, आयकर किंवा सीबीआय यातल्या कुणाच्याच मागे आजवर का लागलेल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे या तिन्ही पक्षांमध्ये नुरा कुस्ती आहे. तिन्ही पक्ष मिळून एकच टीम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. मल्काजगिरीत राहुल गांधी व प्रियंका गांधी वढेरा यांनी रोड शोही केला.
कामगारांशी संवाद : राहुल गांधींनी ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधला. टमटम कामगार आणि स्वच्छता कामगारांशी ते बोलले. सोबत अझहरुद्दीन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ज्युबली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझहरुद्दीन हेही यावेळी उपस्थित होते.
सर नको राहुल म्हणा : राहुल गांधींनी एका भाजी विक्रेत्याला जेवण वाढले. मिठी मारून म्हणाले, सर नको मला राहुलच म्हणा! या प्रसंगाचा व्हिडीओ त्यांनी स्वतः शेअरही केला.




