पुणे : मागील काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार एन्ट्री करण्याच्या नादात बीआरएस पक्षाला स्वतःच्याच राज्यात फटका बसताना दिसत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तेलंगणात ११९ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. ६० जागा मिळवणारा पक्ष सत्ता स्थापन करुर शकणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि BRS अशी तिरंगी लढत या ठिकाणी पार पडली आहे. या लढतीत कुणाचा विजय होणार हे ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होईलच. मात्र आता एग्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत.
इंडिया टीव्ही सीएनक्सच्या एग्झिट पोलचा अंदाज सांगतो आहे की बीआरएसला ३१ ते ४७ जागा मिळतील. तर काँग्रेसला ६३ ते ७९ जागा मिळतील. भाजपाला २ ते ४ जागा मिळतील. तर एमआयएमला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच काँग्रेसला तेलंगणात स्पष्ट बहुमत मिळणार हा अंदाज या पोलने वर्तवला आहे.
‘जन की बात’ चा एग्झिट पोल काय सांगतो?
बीआरएसला ४० ते ४५ जागा मिळतील असा अंदाज जन की बातने वर्तवला आहे. तर काँग्रेसला ४८ ते ६४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला ७ ते १३ जागा मिळतील तर एआयएमआयमला ४ ते ७ जागा मिळतील असा अंदाज या पोलने वर्तवला आहे.
रिपब्लिक टीव्हीचा पोल काय सांगतो?
काँग्रेसला ५८ ते ६८ जागा मिळतील असा अंदाज या पोलने वर्तवला आहे. तर बीआरएसला ४६ ते ५६ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपाला ४ ते ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर एमआयएमला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज आहे.
टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्टचा अंदाज काय सांगतो?
काँग्रेसला ४९ ते ५९ जागा मिळतील, बीआरएसला ४८ ते ५८ जागा मिळतील तर भाजपाला ५ ते १० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर एमआयएमला ६ ते ८ जागा मिळतील असा अंदाज आहे.



