मुंबई : अयोध्येतल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन निमंत्रणपत्रिका दिली. तसंच सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आग्रह केला.



