पुणे : पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्व. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील लोकसभा निवडणूक घेण्यात आली नाही.
त्याबाबत पुण्यातील सुघोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दिली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पुणे लोकसभा पोट निवडणुकीला स्थगिती दिली आहे.



