मुंबई : शिवसेना कोणाची हे आता फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं.
मात्र तेव्हा 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं.
मात्र याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आता 2 फेब्रुवारीला सुनावणी पार पडेल. या सुनावणीत ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो? आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



