मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृतपणे युती झालेली आहे. शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही युती जाहीर केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आणि आमच्याबरोबर वंचितची युती आहे. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीसोबत लोकसभेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र बसून चर्चा झाली असून त्यात काही निर्णयही झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर लढतात आणि त्यांनीच ती लढवावी याबाबत महाविकास आघाडीत एकमत आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. यासोबत कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार जाहीर करता येतील याच्यावरील चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे.



