मुंबई : टाटा #मुंबईमॅरेथॉन -२०२४ च्या फ्लॅग ऑफ कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
#टाटामॅरेथॉन ही जगातील अतिशय प्रतिष्ठित मॅरेथॉन असून गेली १९ वर्षे तिचे यशस्वी आयोजन होत आहे. यंदा या स्पर्धेत ५६ हजाराहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आपल्या वयाच्या आणि शारीरिक मर्यादांचा विचार न करता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात हे या स्पर्धेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल आदी उपस्थित होते.



