- पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू – अजित पवार
- निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच मानले आभार…
मुंबई दि. ६ फेब्रुवारी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जनतेला दिला.
निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे असेही अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया देतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त केले.



