महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने उलथापालथ होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता काँग्रेसला गळती लागली आहे. गेल्या महिन्याभरात काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रवेश केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला रामराम केला. ते भाजपात जाणार असल्याने काँग्रेस पक्षातील राजकारणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत चर्चा करताना दिसत आहे.
यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्या सह काँग्रेसचे काही पदाधिकारी शरद पवारांच्या सोबत पुढील दिशा ठरविण्यासाठी चर्चा करताना दिसत आहेत.
आणखी काही काँग्रेस नेते भाजपासह महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राजधानी दिल्लीतलं वातावरणही तापलं आहे. कारण शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर दाखल झाला आहे. राज्यात आणि देशात सध्या राजकारण कमालीचे तापले आहे.



