कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कुटुंबासाठी काढली नव्हती तर सर्वसामान्य नागरिकांसाठी काढली होती. गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली, त्यानंतर हू इज एकनाथ शिंदे अशी विचारणा होऊ लागली. यामध्ये गुगलचं रेकाॅर्ड मोडलं, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
शिंदे गटाची आज कोल्हापुराती गांधी मैदानात जाहीर सभा होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अधिवेशनानंतर ही जाहीर सभा होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व नेते उपस्थित आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची दिवाळी आज कोल्हापुरात साजरी होत असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. बाळासाहेबांच्या पैलवानांने कोल्हापुरात शड्डू ठोकून सलामी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले



