मुंबई: वांद्रे रिक्लेमेशन येथे मोक्याच्या ठिकाणी असलेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मालकीचा तब्बल २४.२ एकराचा भूखंड अदानी रियल्टीने पटकावला आहे. अदानी आणि एल अँड टी यांनी सदर भूखांडासाठी अंतिम बोली लावली होती.
मात्र अदानीची सर्वाधिक बोली ठरल्याने सदरचा भूखंड त्यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र त्यावर अंतिम शिक्कामोर्तब महामंडळाच्या पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत होणार आहे. दरम्यान या भूखंडाच्या माध्यमातून एमएसआरडीसीला सुमारे ८ हजार कोटी रूपयांचा महसूल मिळणार आहे
वांद्रे पश्चिम येथे एमएसआरडीसीचा भूखंड आहे. त्याच्या विक्रीसाठी महामंडळाने निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये अनेक कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. मात्र अंतिम निविदांसाठी अदानी रियल्टी आणि एल अॅण्ड टी कंपनी पात्र ठरली होती. त्यानुसार दोन्ही कंपन्यांनी भरलेल्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या असून त्यामध्ये सदर भूखंडाच्या विकासातून मिळणा-या महासूलाच्या सुमारे २२. २७ टक्के हिस्सा महामंडळाला देण्याचा बोली अदानीने लावली होती, तर एल अँड टीने १८ टक्के हिस्सा देण्याची बोली लावली होती.
यामध्ये अदानी रियल्टीची सर्वाधिक बोली ठरल्याने सदरचा भूखंडा त्यांना मिळणार असल्याचे निश्चत झाले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिका-याने दिली.



