कोल्हापूर : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी देणार का? या प्रश्नाला उत्तर दिलं. यावेळी काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या.
शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा होती की त्यांना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, मी इतकं वर्षे इथं येतोय पण कोणी माझ्या कानावर हे घातलं नाही. तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो की याबाबत मी एकट्यानं निर्णय घ्यायचा मला अधिकार नाही.
कारण आमची आघाडी आहे. यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामुळं जागांसंबंधिची निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. मी यावर माझ्याही सहकार्यांशी अद्याप चर्चा केलेली नाही.



