पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. एकमेकांवर भरसभेत तारेशे ओढताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांर्तगत वेगवेगळ्या हालचाली होताना दिसत आहे. या सगळ्यातच शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी अजित पवार यांची सकाळी भेट घेतली आहे.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत



