मुंबई – देशासह जगभरात विख्यात असलेल्या मुंबई पोलीस दलाची किर्ती सातासमुद्रापलीकडे असल्याचं बोललं जाते. दिवसरात्र मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या शहराच्या रक्षणासाठी कायम सज्ज असणाऱ्या या पोलिसांच्या सन्मानासाठी एक गाणं तयार करण्यात आले आहे. हे गाणे मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले असून एका पोलीस कर्मचाऱ्यानेच हे गाणं लिहिलं आहे.
या गाण्याचं टायटल आहे आले रे आले मुंबई पोलीस..पोलीस कॉन्स्टेबल मयूर राणे यांनी लिहिलेलं गाणं मुंबई पोलिसांचे शौर्य, वीरता आणि कटिबद्धता याचं उदाहरण मानलं जाते. हे गाणे ऐकून तुमच्याही मनात अभिमानाची भावना नक्कीच जागृत होईल. या व्हिडिओच्या चित्रिकरणात विविध पदावरील आणि खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले आहे. त्यात शहरातील नागरिकांना भयानक परिस्थितीतही पोलीस कसे मदत करतात हे दाखवलं आहे.



