पुणे : अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे समीकरण कायमच ठरलेलं आहे. जिथे केतकी तिथे वाद आपसुकच येतो. नुकतंच केतकीने तिच्या घरी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचारीसोबत हुज्जत घातली होती. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली. त्या प्रकरणामुळे चर्चेत असतानाच केतकी चितळे आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी केलेले वक्तव्य असून त्या वक्तव्यावरूनच तिने त्यांच्यावर टीका केली आहे.
नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी “धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना.” असं विधान केलं होतं. हे विधान इन्स्टा स्टोरीवर शेअर करत तिने आपल्या खास अंदाजामध्ये त्यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य शेअर करत केतकी म्हणते, “आता कसे, खरे रूप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा.” असं कॅप्शन देत तिने स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करून अवघे काही तासच झाले असून अवघ्या काही तासांतच अभिनेत्रीचीही पोस्ट सोशल मीडिया वर



