इस्लाम धर्मातील पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. मुस्लीम बांधव ज्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, अशा रमजान महिन्याचं वेळापत्रक आता समोर आलं आहे.
चंद्रदर्शनासह भारतात रमजानची सुरूवात : १२ मार्च,
रविवार रमजान संपतो: ९ एप्रिल,
मंगळवार लैलात अल-कद्र: ६ एप्रिल,
शनिवार ईद अल-फितर: ९ एप्रिलची संध्याकाळ (मंगळवार) – १० एप्रिल (बुधवार) (तात्पुरती तारीख) उद्या मंगळवारी पहिला रोजा सुरू होणार आहे. सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसला, त्यामुळे तेथील बांधव 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात करतील, तर भारतात 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. रमजान इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा नावाचा कडक उपवास पाळतात.
इस्लामिक कॅलेंडरच्या आठव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिलाल म्हणजेच अर्धचंद्र दिसल्यानंतर रमजान महिन्याची सुरुवात होते, असं मानलं जातं. अशातच आता रमजानला सुरूवात होत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो, याला सेहरी असं म्हणतात. तर दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केली जाते आणि खजूर खाऊन उपवास सोडला जातो, याला इफ्तार असं म्हणतात.



