पुणे: म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4882 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरे, पंतप्रधान आवास योजना आणि खाजगी-शासकीय भागिदारीतील घरे, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे आहे आणि त्याची किंमत किती आहे? जाणून घ्या….
म्हाडाच्या पुण्यातील लॉटरीत सर्वात स्वस्त घर
म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेच्या अंतर्गत विक्रीसाठी असलेल्या घरांमध्ये सर्वात स्वस्त घराचा समावेश आहे. हे घर अल्प उत्पन्न गट (LIG) साठी आहे. सर्वे क्र. 1712 (भाग) – दिवे-पुरंदर येथे एकूण 17 घरांचा समावेश आहे. यामधील घराची अंदाजित किंमत 944800 रुपये इतकी आहे. या घरांचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी.) 29.40 इतके आहे.
तर याच योजनेत अत्यल्प उत्पन्न गट (EWS) साठी उपलब्ध असलेल्या घरांमधील चाकण-महाळुंगे-इंगळे-फेज- II (PMAY) घरांची अंदाजित किंमत 1361895 रुपये इतकी आहे. या ठिकाणी 32 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या घरांचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी.) 51.59 इतके आहे.
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
या योजनेत येवलेवाडी येथे 12 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या घरांचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी.) 43.65 ते 49.49 इतके आहे. तर या घरांची अंदाजित किंमत 1394400 ते 1581000 रुपये इतकी आहे. या योजनेचा संकेत क्रमांक 798 सी असा असून योजनेचे नाव सद्गुरु रेसिडेन्सी, मे. मा. प्रणाम बिल्डकॉन प्रा. लि., स. नं. 2, हिस्सा नं. 4 / 2 / 2, येवलेवाडी असे आहे. ही घरे 1 बीएचके आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन व अनामत रक्कमेचा भरणा करुन म्हाडा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज कसा भरावा?, अर्ज भरण्याची पद्धत, घरांच्या किमती या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी म्हाडा लॉटरी 2024 या लिंकवर क्लिक करुन अधिकृत जाहिरातीची पीडीएफ (Pune MHADA Lottery 2024 notification pdf) फाईल पहावी.
पुणे म्हाडा लॉटरी 2024 साठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जसाठी नोंदणी – 7 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून)
ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 8 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून)
ऑनलाईन पेमेंट स्विकृती – 8 मार्च 2024 (दुपारी 3 वाजल्यापासून)
ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
ऑनलाईन पेमेंट अंतिम तारीख – 12 एप्रिल 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची यादी प्रसिद्ध – 24 एप्रिल 2024 (सायंकाळी 7 वाजता)
सोडत दिनांक – 8 मे 2024 (सकाळी 10 वाजता)
सोडतीचे स्थळ – गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय, पुणे




