आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक बडे नेते पक्ष बदल करताना दिसत आहेत. त्यात काल अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच मुद्द्यावर निलेश लंकेचे जवळचे मित्र आमदार सुनील शेळके यांनी मोठा आरोप केलाय. निलेश लंकेंचा महाविकास आघाडी बळी घेतेय, असा आरोप शेळके यांनी केला आहे.
महायुतीची दक्षिण नगरची जागा सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. जर ती जागा भाजपकडेच जाणार असेल आणि तिथे महाविकास आघाडीसाठी पर्याय शिल्लक नव्हता. ज्यांना पर्याय म्हणून उभं केलेलं त्या रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळेच निलेश लकेंना गळ घालून तिथून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाग पाडलं जातय. पण मला विश्वास आहे, निलेश लंके कुठेच जाणार नाहीत, ते दादांसोबतच राहतील, असं सुनील शेळके म्हणाले.



