लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यातच काही दिवसापूर्वी काँग्रेसचे विश्वासू आणि ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी हे नंदुरबारच्या शहादा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. राज्याचे माजी क्रीडा मंत्री वळवी हे नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.



