
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीत येण्याविषयी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर अप्रत्यक्षपणे धुडकावून लावली. उद्धव यांनी भाजप नेत्यांची चिंता करू नये. भाजपला घेरण्यासाठी उद्धव यांनी गडकरींना ऑफर दिली. त्यावर गडकरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. उद्धव यांचे वक्तव्य अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे असे त्यांनी म्हटले.
भाजपने काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, गडकरींचे नाव नसल्याने भुवया उंचावल्या गेल्या.



