
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पुण्याहून हेलिकॉप्टने आलेले विजय शिवतारे यांना जवळपास सात तास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागले. अखेर रात्री साडे आठ वाजता शिवतारे यांच्यासह पुरंदरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवतारे यांनी बारामतीमधील सध्याची राजकीय परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून अपक्ष लढण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
बैठकीनंतर शिवतारे म्हणाले….
मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. माझ्याबरोबर पुरंदरचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य असे सगळे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते होते. आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना (एकनाथ शिंदे) आम्हाला होत असलेला त्रास सांगितला. आमच्या भावना त्यांना कळविल्या. त्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. दोन दिवसानंतर पुन्हा निवडक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा होणार आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.




