लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किंमती लागू होणार आहेत . केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ”पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.



