मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले आहेत. हातकणंगले लोकसभा जागेसंदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्यात आली आहे.
मात्र, महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी या आधी सांगितलं होतं. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून बाहेरून पाठिंबाची अपेक्षा आहे, तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने त्यांनी पक्षाचे चिन्हावर लढावं या संदर्भात विचारणा केली आहे. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या मध्ये पुन्हा एकदा मातोश्रीवर यासंदर्भात चर्चा केली जात आहे



