मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची चैत्यभूमीवर सांगता झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहतील. ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल.
देशभर लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारच्या विरोधात देशातील सर्व राज्यातील छोट्या अपक्षा सोबत काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राहुल गांधी यांच्या समवेत आज मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर इंडिया गाडीची सभा होऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची चैत्यभूमीवर सांगता झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये सोनिया गांधी शरद पवार राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर इंडिया आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. जागावाटपाबाबत या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची यात्रा मुंबईत असल्याने या बैठकीला विशेष महत्व आहे.



