सातारा : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असून पहिला टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून, सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी एकाचवेळी म्हणजे येत्या ४ जून रोजी होणार आहे.
महायुती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे त्यामुळे मागील निवडणुकीतून पराभव पत्करल्यानंतर पुन्हा उदयनराजे भोसले निवडणुकीसाठी आग्रही आहे. त्यामुळे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील निवडणूक लढणार नाहीत त्यामुळे ते राजकारणात संदेश घेणार काय अशा चर्चांना उधाण आले होते. यावर्षी प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले म्हणाले की मी राजकारणातून संन्यास घेणार नाही माझ्या उमेदवारी बाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील.




