मुंबई : महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चेचा गुराळ कायम असताना काँग्रेसच्या सात जागावर वंचितने पाठिंबा देत आघाडीला कात्रज घाट दाखविला आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रकाश आंबेडकर यांना आघाडी सोबत येण्याची विनंती केली होती. मात्र याच पक्षातील एका नेत्याच्या कारणामुळे प्रकाश आंबेडकर दोन हात लांब आहेत अशी चर्चा सुरू आहे.
काँग्रेसने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हत्ती लागणाऱ्या सात जागा यांची यादी आम्हाला द्यावी वंचित बहुजन आघाडी या सर्व जागांवर पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरग यांना पत्र लिहिले. आघाडीत दहा जागांवर काँग्रेसवर शिवसेना यांच्यात तर पाच जागावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात वाद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरत नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएम अशी युती होती. त्यावेळी वंचितने एकूण 47 जागावर आपली उमेदवार उभे केले होते. राज्यात वंचित आघाडीच्या सर्व उमेदवारानी लक्षणीय मताधिक्य घेतले. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. वंचित आघाडीची मते प्रत्येक लोकसभा मतदार संघात दिसून आली. आंबेडकरांनी काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत त्या ठिकाणी आपली ताकद काँग्रेसच्या बाजूने उभी करण्याची खेळी का केली आहे, तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फारकत देत आहेत का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.



