पुणे : पुणे हे देशातील एक ऐतिहासिक शहर आहे. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा अनेक नावाने पुणे शहर ओळखले जाते. मराठी भाषेवरील प्रेम, पुणेरी पाट्या, येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती इत्यादी गोष्टींमुळे पुणे खूप जास्त लोकप्रिय आहे. दरवर्षी हजारो लोकं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात येतात. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती पुण्याच्या प्रेमात पडतो.
सोशल मीडियावरही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे शहर नेहमी चर्चेत असतं. तुम्हाला पुण्याविषयी काय माहिती आहे का? तुम्हाला माहितीये का पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे? तुम्हाला वाटेल, पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे, हे सहज कोण सांगू शकते? पण काही लोकांनी याचे खरे उत्तर दिले आहे ज्या उत्तराला तुम्हीही नाही म्हणणार नाही. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
व्हायरल होतोय व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पुणे शहर दिसेल. व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे? त्यानंतर पुढे व्हिडीओत दगडूशेठ गणपतीचा फोटो दाखवतात आणि त्यावर कॅप्शन दिसून येते की पुण्यात श्रीमंत एकच. या व्हिडीओवर सुंदर श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय हे सुंदर गाणे लावले आहे.




