पुणे : महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये भाजप व काँग्रेसच्या काही लढती जवळपास स्पष्ट झाले आहेत.
यामध्ये पुणे लोकसभेसाठी भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धुगेकर, नंदुरबार लोकसभेसाठी भाजपचे हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, नांदेड लोकसभेसाठी भाजपचे प्रतापराव पाटील विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण तर लातूर लोकसभेसाठी भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यातील लढती फायनल झालेल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने आपले ११ उमेदवार घोषित केले असले तरीही अद्याप महायुतीकडून त्या त्या जागी उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. काँग्रेसकडून ‘या’ उमेदवारांची नावे निश्चित केली आहे.
चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
नागपूर – आ.विकास ठाकरे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी (के. सी पाडवी यांचा मुलगा)
नागपूर – आ.विकास ठाकरे
गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
गडचिरोली – नामदेव किरसान
अकोला – अभय पाटील
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ. कलगे
दोन किंवा तीन जागांसाठी चर्चा सुरु, वडेट्टीवार यांची माहिती दिली आहे.



