दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान आज केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवालांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती.
कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या टीमने आज अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.
ईडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आज देशभरात निदर्शने करत आहेत.




