पुणे : विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान आहे. याला मातीत गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. शिवतारे यांची फडफड विझणाऱ्या दिव्यासारखी आहे. केवळ बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये गोळा करण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहेत”, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.
शिवतारे यांच्या मागे इतर व्यक्तींचा मेंदू आहे. त्याचा तपास आम्हाला करावा लागेल. थोड्या पैशांसाठी बार्गेनिंग पॉवर वापरायची आणि कोणत्यातरी पक्षाकडून ५-२५ लाख घ्यायचे. यासाठी त्यांची तडफड सुरु आहेj असंही अमोल मिटकरी म्हणाले.
तुकारामांचा अभंग सांगत टीका
शिवतारे बालीश वक्तव्य करत आहेत. त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. त्यांच्या बैठकीला कोणीही किंमत दिलेली नाही. तुकाराम महाराजांचा शिवतारेंवर अभंग आहे. ‘विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी’. विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं. तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे आहे. तुमच्या भागातील मतदार मुरारबाजीच्या भूमिकेत आहेत, असंही अमोल मिटकरी यांनी सांगितले. मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त आहे. त्याच्या शिवाय हे बोलू शकत नाहीत. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.



