मुंबई – गँगस्टर सुभाष पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी याला अखेर चीनमध्ये अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर गँगस्टर प्रसाद पुजारीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन दाखल झाले. मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद पुजारी हा सुमारे २० वर्षांपासून फरार होता, त्यासाठी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. प्रसाद पुजारीवर मुंबईत खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
२०२० मध्ये मुंबईत प्रसाद पुजारी विरोधात शेवटच्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी भारतातून पळून चीनमध्ये वास्तव्य करत होता.



