नवी दिल्ली – आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्येही मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. अशातच भाजपचे पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पंजाबमधील मद्य धोरण प्रकरणी सखोल ईडी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पंजाबमधील मद्य धोरणप्रकरणी यापूर्वी तीन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त आयुक्त (अबकारी) के.ए.पी. सिन्हा, वरुण रुजम व नरेश दुबे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी २०२२ मध्ये पंजाबमधील मद्य धोरण तयार केले होते. तसेच या धोरणांतर्गत पंजाबमध्ये मद्यविक्रीसाठी घाऊक परवाने मिळालेल्या दोन कंपन्यांचे प्रवर्तक दिल्लीतील कथित मद्य प्रकरणी कारवाई होऊ शकते.




