मुंबई : गेल्या अनेक वर्षांत मुंबईत अब्जाधिशांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात मुंबईतील अब्जाधिशांच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे चीनची राजधानी असलेल्या बीजिंगलाही मुंबईने मागे पाडले आहे. म्हणजेच, आशिया खंडात मुंबई ही अब्जाधिशांची राजधानी बनली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हुरुन रिसर्चच्या २०२४ ची जागतिक श्रीमंतांची यादी समोर आली आहे. आशिया खंडात अव्वल क्रमांक मिळावलेली मुंबई जागतिक स्तरावरही तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्युयॉर्क, दुसऱ्या क्रमांकावर लंडन आणि मग तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे.
चीनमध्ये ८१४ अब्जाधिश असून भारतात २७१ आहेत. तर, शहरांच्या तुलनेत विचार करायचा झाल्यास, मुंबईमध्ये ९२ अब्जाधिश असून बीजिंगमध्ये ९१ अब्जाधिश आहेत, असं हुरून रिसर्च २०२४ च्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतून स्पष्ट होत आहे.



