मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 एप्रिल 2024 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. RBI चा गेल्या 90 वर्षातील प्रवासाचा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”आज भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. RBI ला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. RBI ही एक संस्था म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाची साक्षीदार आहे.
आज RBI तिच्या व्यावसायिकतेमुळे आणि बांधिलकीमुळे जगभरात ओळखली जाते. RBI च्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो



