नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे. भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी पवारांनी दाखवली होती. पण जानकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेत परभणीची जागा पदरात पाडून घेतली.
नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं मोहिते पाटील कुटंब नाराज आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी विरोध आहे. पण मोहिते पाटील कुटुंब भाजप सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार सध्या माढ्यासाठी उमेदवाराच्या शोधात आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची एक बैठक दिल्लीत झाली. यावेळी शिरुरचे खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते.


