अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मेळघाटमध्ये आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने आदिवासी महिलांनी साड्याची होळी केली आणि जाळून टाकली होती. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.
निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्याने मेळघाटमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. यावरून प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडूंनी राणे दाम्पत्यावर बोचक टिका केली आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता.या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका केली. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटाची बेईज्जती असं त्यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू यांनी सांगितले की, प्रचारासासाठी आम्ही काढणारी रॅली ही चित्र बदवून टाकणारी आहे. २ कोटीच्या गाडीतून फिरायचं आणि १७ रुपयांची साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका. १७ रुपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही असंही टोला राणांना लगवला आहे. अमरावतीतून नवनीत राणांना दिलेली उमेदवारी ही डोकेदुखी असू शकते असं कार्यक्रमात टीका केली.



