पुणे : वंचितकडून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, मी मनापासून प्रकाश आंबेडकर यांचा आभारी आहे. पुणे लोकसभेसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याचा फोन आला होता. पुण्यात पहिल्यापासून तिरंगी लढत होईल हे सुरू होते. माझ्या विजयाची १०० टक्के खात्री आहे. कुठलेही आव्हान अवघड नाही. आतापर्यंत कायम संघर्ष करत आलोय. हा संघर्ष नवीन नाही. पुण्याचा खासदार हा वसंत मोरेच असेल असं त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ, मविआकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वसंत मोरे यांनी कुठल्याही परिस्थिती लोकसभा निवडणूक लढणारच असा चंग बांधला होता. मोरे यांनी मनसेतून राजीनामा देत बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीसाठी गेले मात्र त्यांना उमेदवारी बाबत अपयश आले त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देऊन पुण्यात तिरंगी लढत होणार असे चित्र निर्माण झाले आहे.




