
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीकडून तिसरी यादी पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे.
विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होती.
मात्र, एमआयएमने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघांत वंचितला साथ दिली नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अफसर खान यांना रिंगणात उतरवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे.



