
मुंबई : अभिनेते गोविंदा राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवणारे गोविंदा दुसऱ्या सिझनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
अभिनेते गोविंदा यांना धनुष्यबाण चिन्हावर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उतरवण्याबाबत चाचपणी सुरु आहे. उत्तर पश्चिम ही जागा महायुतीत भाजपला सोडल्याची चर्चा होती. परंतु आता शिंदे गट या जागेवरुन उमेदवार उतरवण्याच्या हालचाली दिसत आहेत. काही काळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोविंदा यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.



