
वायनाड; काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. तत्पर्वी, बहीण प्रियांका गांधी-वधेरा यांच्यासोबत राहुल यांनी रोड शो केला. तुमचा खासदार असणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या सीपीआयच्या अॅनी राजा या वायनाडमधून राहुल यांच्याविरोधात आहेत. नी यांनीही बुधवारीच रोड शोसह उमेदवारी अर्ज दाखल केला, हे विशेष. भाजपकडून राहुल यांच्याविरोधात के. सुरेंद्रन मैदानात आहेत




