![]()
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही आमचीच शिवसेना असल्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेवर इतकी नामुष्की ओढवली. बंडानंतर शिंदेसोबत गेलेल्या खासदार, आमदारांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुद्धा भाजपाच्या दबावामुळं त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर ओढवली आहे.
३७० च्या नादात सहयोगी पक्षाच्या विद्यमान खासदारांचा बळी जात आहे. सुरुवातीला मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि रामटेकचे कृपाल तुमाने या दोघांचे तिकीट कापण्यात आले. यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचंही तिकीट अखेर कापण्यात आलं. ख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या वाढत्या दबावाखाली ते पूर्णतः झुकले असून नाराज खासदारांना आणि नेत्यांना काय उत्तर द्यावं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
४ खासदारांचा पत्ता कट :
खासदार गजानन कीर्तिकर आणि रामटेकचे कृपाल तुमाने, भावना गवळी , हिंगोलीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील , नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे , हातकणंगले मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केलीय. तिथे सुद्धा स्थानिक भाजपा नेत्यांकडून त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होत आहे. अशा परिस्थितीत हेमंत पाटील यांच्याबरोबर जे झालं ते धैर्यशील माने यांच्याबरोबर सुद्धा होऊ शकतं या भीतीने शिंदे गटाचे नेते भयभीत झाले आहेत.
मुख्यमंत्री स्वतःच्या पुत्राची उमेदवारी घोषित करू शकत नाहीत :
रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून नारायण राणे हे उमेदवारीसाठी आक्रमक झाले असून इथेही शिंदे गटाचे किरण सामंत यांना उमेदवारी मिळणं मुश्किल झालं आहे. भाजपाकडून सर्वेक्षणाचा अहवालचा फटका अमरावतीमध्ये शिंदे गटाचे नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही बसला आहे. भाजपाकडून तिथे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र पूर्णतः हतबल झाले आहेत. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या उमेदवारीची घोषणाही करण्यात शिंदे यांना वाट पाहावी लागत आहे.



