नवी दिल्ली : भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज दिली. आतापर्यंतच्या परकीय चलन साठ्यातील हा उच्चांकी आकडा असल्याचंही शक्तिकांत दास यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारताचा परकीय चलन साठा 29 मार्च 2024 पर्यंत तब्बल 645.6 डॉलर इतका झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
सलग सातव्यांदा रेपो रेट दर स्थिर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) मुद्रा नीती धोरण बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत रेपो रेट दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सलग सातव्यांदा रेपो रेट दर 6.5 टक्के स्थिर ठेवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट दरानं इतर बँकांना कर्जपुरवठा करते. त्यामुळे रेपो रेट दराला महत्व प्राप्त होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. 5-1 अशा बहुमतानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 5:1 च्या बहुमतानं सलग सातव्यांदा रेपो रेट दर कायम ठेवला.
- FY25 साठी CPI महागाई 4.5 टक्क्यांवर ठेवली Q1FY25: CPI अंदाज आधीच्या 4.5 टक्क्यांवरुन 4.9 टक्क्यांवर गेला. Q2FY25: CPI अंदाज आधीच्या 4 टक्क्यांवरुन 3.8 टक्क्यांवर गेला. Q3FY25: CPI अंदाज 4.6 टक्क्यांवर अपरिवर्तित आहे. Q4FY25: CPI अंदाज आधीच्या 4.7 टक्क्यांवरुन 4.5 टक्के इतका कमी झाला.
- FY25 वास्तविक जीडीपी वाढ 7 टक्क्यांवर अंदाजित आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच IFSC मध्ये सॉवरेन ग्रीन बॉण्ड्सच्या ट्रेडींगला अधिसूचित करणार आहे.
- G-Sec मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी RBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये प्रवेश करण्यासाठी मोबाईल अॅपची योजना करण्यात आली आहे.
- यूपीआय वापरुन CDM मध्ये रोख ठेव सुलभ करण्याचा प्रस्ताव, बँकांमधील रोख व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पाऊल.




