
सातारा : उमेदवारीबाबत बहुप्रतिक्षेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हा फलटणकर किंवा अकलूजकर त्यांच्यापैकी एक असणार आहे. माढा उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा सुटणार आहे.
गुढीपाडव्यादिवशी तुतारी हातात घेण्याचा निर्णय झाला असून याच दिवशी उमेदवाराची घोषणा होऊन दि. १२ किंवा १३ रोजी माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय हा निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते.



