
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बँक फसवणूक प्रकरणात एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या विरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश जारी केला आहेत. यामध्ये विक्रम होम्स प्रायव्हेट लिमिटेडची ४०.३७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संलग्न मालमत्ता ही व्यावसायिक मालमत्ता आहे. त्याची कार्यालये कॅलेडोनिया बिल्डिंग, अंधेरी पूर्व, मुंबई येथे आहेत.
मॅक स्टारचे 300 कोटी रुपयांचे नुकसान
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि इतरांविरुद्ध सीबीआयने (एसीबी) नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे आर्थिक तपास संस्थेने तपास सुरू केला आहे. येस बँकेने मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला 200 कोटी रुपयांची मंजुरी दिली. सुरुवातीला, मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपानुसार, वाधवान यांनी मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची कॅलेडोनिया इमारत बेकायदेशीरपणे आणि फसवणूक करून विकली. यामुळे मॅक स्टारचे 300 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.



