मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ह नेते एकनाथ खडसे स्वगृही मार्गावर आहेत. आज रविवारी त्यांची घरवापासी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आयुष्यातील ४० वर्ष भाजपत गेलेल्या खडसेंची परवापसी होणार आहे. त्यानंतर त्यांना युपी करिता राज्यपाल करण्याचे अभिवचन दिल्याचे वृत्त आहे.
चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत, भाजपला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित बळ मिळत नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंना पुन्हा गळ टाकत स्वगृही परतण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
एकनाथ खडसे यांनी तीन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा करून आल्यावर माध्यमांशी वक्तव्य करताना म्हटले होते की, भाजपमध्ये जायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी माझे उत्तम संबंध राहिले आहेत. आत्ताही त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जायचे असल्यास मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असे सूचक वक्तव्य केले होते.



